Ticker

6/recent/ticker-posts

शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

नमस्कार विदयार्थी मित्रानो आज आपण मराठी व्याकरण मधील शब्दयोगी अव्यय हा भाग बघणार आहे यामध्ये आपण सर्वप्रथम शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, शब्दयोगी अव्ययाचे प्रकार किती, शब्दयोगी अव्यायचे प्रकार कोणते आणि त्यांची उदाहरणे असे सर्वकाही सविस्तरपणे अभ्यासणार आहे. या भागावर नेहमी स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तर चला बघूया आजचा topic..

शब्दयोगी अव्यय

    जे शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतात व त्या शब्दाचा वाक्यातील इतर  शब्दाशी असलेला संबंध दाखवितात त्यांना 'शब्दयोगी अव्यय' असे म्हणतात.

                उदाहरणार्थ  :  घरावर पत्रे आहे.
                                      दारापुढे रांगोळी घाला.
                                      अभ्यासाकडे लक्ष दया.

shabdayogi avyay v tyache prakar,शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार,shabdayogi avyay in marathi

शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार



शब्दयोगी अव्ययाचे पुढिलप्रमाणे नऊ प्रकार पडतात 

(१) कालवाचक शब्दयोगी अव्यय  :  

        आता, पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो, आतून, खालून, मधून, पासून इ.

(२) स्थलवाचक शब्दयोगी अव्यय  :  

        आत, बाहेर, पुढे, मागे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठाई, पाशी, नजीक, समीप, समक्ष इ.

(३) करणवाचक शब्दयोगी अव्यय  :

        मुळे, कडून, वारा, योगे, करुण, हाती इ.

(४) हेतुवाचक शब्दयोगी अव्यय  :

        साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव इ.

(५) तुलनावाचक शब्दयोगी अव्यय  :

        पेक्षा, तर, तम, मध्ये, परिस इ.

(६) व्यातीरेकवाचक शब्दयोगी अव्यय  :

        शिवाय, घेरील, वीणा, वाचून, व्यतिरिक्त, परता इ.

(७) योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय  :

        योग्य, सारखा, जोगा, सम, समान, प्रमाणे, बरहुकुम इ.

(८) सह्चार्यवाचक शब्दयोगी अव्यय  :

        बरोबर, सह, संगी, सकट, सहित, सर्वे, निशी, सामवेद इ.

(९) विरोधवाचक शब्दयोगी अव्यय  :

        विरुद्ध, वीण, उलटे, उलट इ.






नक्की वाचा !!

क्रियाविशेषण व त्याचे प्रकार

Post a Comment

1 Comments