Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

क्रियाविशेषण व त्याचे प्रकार

 

क्रियाविशेषण

    जो शब्द क्रीयापादाबद्दल  विशेष माहिती सांगतात त्यांना 'क्रियाविशेषण' असे म्हणतात.

                उदाहरणार्थ  :  मांजराने उंदराला पटकन पकडले.
                                      तु फार लबाड मुलगा आहेस.

kriyavisheshan v tyache prakar,क्रियाविशेषण व त्याचे प्रकार, kriya visheshan
क्रियाविशेषण व त्याचे प्रकार


क्रियाविशेषणाचे एकूण सहा प्रकार पडतात.

(१) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
(२) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
(३) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
(४) संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
(५) प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय
(६) निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय


(१) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

    ज्या वाक्यातील क्रिया केव्हा किती वेळ किंवा किती वेळा घडली व ज्या वरून काळाचा बोध होतो त्यास 'कालवाचक क्रियाविशेषण' असे म्हणतात.

कालवाचक क्रियाविशेषणाचे आणखी तीन उपप्रकार पडतात.
(अ) कालदर्शक
(ब) सातत्यदर्शक
(क) आवृत्तीदर्शक

(अ) कालदर्शक

    ज्या वाक्यातील क्रिया ही कोणत्या वेळेस म्हणजे कधी घडली याचा बोध होतो त्याला कालदर्शक असे म्हणतात
                उदाहरणार्थ  :  आता, आधी, सध्या, तूर्त, हल्ली, सांम्प्रत, उद्या, पर्वा, लगेच, केव्हा, जेव्हा,
                                      पूर्वी, मागे, दिवसा, रात्री, नंतर, मग, काल इ.



(ब) सातत्यदर्शक

    ज्या वाक्यातील क्रिया ही किती वेळ घडली याचा बोध होतो त्यास सातत्यदर्शक असे म्हणतात.

                उदाहरणार्थ  :  नित्य, सदा, सर्वदा, अद्यापी, आजकाल, सतत, नेहमी, दिवसभर इ.


(क) आवृत्तीदर्शक

    ज्या वाक्यातील क्रिया ही एकंदर किती वेळा घडली याचा बोध होतो त्यास आवृत्तीदर्शक असे म्हणतात.

                उदाहरणार्थ  :  वारंवार, फिरुंफिरून, पुन्हापुन्हा, दररोज, सालोसाल, क्षणो-क्षणी, तासो-तास, दिवसें-दिवस, महिनो-महिने इ.


(२) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय

    ज्या वाक्यावरून स्थळाचा किंवा ठिकाणाचा बोध होतो त्यास 'स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.

स्थलवाचक क्रियाविशेषणाचे आणखी दोन उपप्रकार पडतात

(अ) स्थितीदर्शक
(ब) गतिदर्शक


(अ) स्थितीदर्शक

    ज्या वाक्यावरून क्रिया ही कोणत्या ठिकाणी घडली याचा बोध होतो त्यास स्थितीदर्शक असे म्हणतात.

                उदाहरणार्थ  :  जेथे, तेथे, येथे, खाली, वर, मागे, पुढे, जिकडे, तिकडे, अलीकडे, पलीकडे, कोठे इ.


(ब) गतिदर्शक

    ज्या वाक्यात क्रिया ही कोणत्या ठिकाणाहून घडली याचा बोध होतो त्यास गतिदर्शक असे म्हणतात.

                उदाहरणार्थ  येथून, तेथून, जेथून, खालून, वरून, पुढून, मागून, जिकडून, तिकडून इ.



(३) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय

    ज्या वाक्यातील क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते यांचा ज्या वरून बोध होतो त्यास 'रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.

रीतिवाचक क्रियाविशेषणाचे आणखी तीन उपप्रकार पडतात 

(अ)  प्रकारदर्शक  :  

        असे, तसे, जसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, हळू, सावकाश, जलद, 


(ब)  अनुकरणदर्शक  :  

        झटकन, पटकन, टकटक, गटगट, चमचम, बदबद, पटापट इ.


(क) निश्चयार्थक  : 

      क्वचीत, खरोखर, अगदी, मुळीच, निश्चित इ.


(४) संख्यावाचक / परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय

    ज्या वरून संख्या परिणाम किंवा ती क्रिया किती वेळा घडली याचा बोध होतो त्यास 'संख्यावाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.

                उदाहरणार्थ  :  नेहमी, अनेकदा, भरपूर, किंचित, जरा, काहीसा, बऱ्याचवेळा, क्वचीत, थोडा, अधिक, अतिशय, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, बहुत, मोजके, पूर्ण, एकदा, दोनदा, पहिल्याने, उन्मळ, फार, प्रथम इ.



(५) प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय

    ज्या वाक्यातील विधानांना प्रश्नाचे स्वरूप देतात त्यास 'प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.

                उदाहरणार्थ  :  तुम्ही त्याच्याकडे जाल का ?
                                      मला बगीच्यात न्याल का ?
                                      सुधा ला घरी ठेवाल ना ?



(६) निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय

    ज्यांच्या अर्थावरून क्रीयेसंबंधी नाकारांचा किंवा निषेधाचा बोध होतो त्यास 'निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.

                उदाहरणार्थ  :  तो चुकता येतो.
                                      तो तोंड उघडेल तर ना.



Post a Comment

0 Comments