समास व त्याचे प्रकार
जेंव्हा दोन किंवा अनेक शब्दामध्ये परस्पर संबंध दाखविणारे प्रत्यय किंवा शब्द काढून त्याचा एकच जोड शब्द तयार होतो तेव्हा त्या शब्दाच्या एकीकरणाला 'समास' असे म्हणतात. आणि तयार झालेल्या त्या जोड शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात.
सामासिक शब्दांचे काही उदाहरण :
साखरभात - साखर घालून केलेला भात
राजवाडा - राजाचा वाडा
कांदेपोहे - कांदे घालून केलेले पोहे
![]() |
समास व त्याचे प्रकार |
समास व त्याचे प्रकार
(१) अव्यायी भाव समास
जेंव्हा समासातील पहिले पद हे अव्यय असुन तो शब्द मुख्य असतो किंवा संपूर्ण शब्द क्रियाविशेषण असते तेव्हा त्यास 'अव्ययीभाव समास' असे म्हणतात.
अव्ययीभाव समासाचे काही उदाहरण
आजन्म - जन्मापासून
प्रतिवर्ष - प्रत्येक वर्ष
यथाशक्ती - शक्ती प्रमाणे
प्रतिदिन - प्रत्येक दिवशी
गैरहजर - हजर नसलेला
घरोघरी - प्रत्येक घरी
(२) तत्पुरुष समास
तत्पुरुष समासाचे काही उदाहरण
तोंडपाठ - तोंडाने पाठ
देवपूजा - देवाची पूजा
ऋणमुक्त - ऋणातून मुक्त
तत्पुरुष समासाचे उपप्रकार
(अ) विभक्ती तत्पुरुष समास
ज्या तत्पुरुष समासात एखाद्या विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्यय काढून दोन्ही पडे जोडली जातात त्यास 'विभक्ती तत्पुरुष समास' असे म्हणतात.
विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण
गर्भश्रीमंत - गर्भापासून श्रीमंत
गाईरान - गाईचे रान
राजकन्या - राजाची कन्या
वनदेवता - वनातील देवता
(ब) कर्मधारय तत्पुरुष समास
पितांबर - पीत असे अंबर
चंद्रवदन - चंद्रासारखे वदन
महादेव - महान असा देव
घनश्याम - घनासारखा श्याम
अलुप्त म्हणजे लोप(काढून टाकणे / निघून जाने) न होणारे . ज्या तत्पुरुष समासात पहिल्या पदाच्या
पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास 'अलुप्त तत्पुरुष समास' असे म्हणतात
अग्रेसर
युदीष्ठीर
कर्तरी प्रयोग
कर्मणी प्रयोग.
ग्रंथकार - करणारा
वंशज - जन्मणारा
विहंग - जाणारा
देशस्थ - राहणारा
अज्ञान
अनावधान
नापसंत
बेडर
गैरहजर
निरोगी
नपुंसक
साखरभात - साखर घातलेला भात
चुलतभाऊ - चुलत्याचा मुलगा म्हणून भाऊ
भोजनभाऊ - भोजना पुरता भाऊ
घोडेस्वार - घोड्यावर स्वार होणारा
(३) व्दंव्द समास
ज्या समासातील दोन्हीही पडे सारखीच महत्वाची असतात त्यास 'व्दंव्द समास' असे म्हणतात
व्दंव्द समासाचे उदाहरण
रामलक्ष्मण
ताटवाटी
विटीदांडू
धर्माधर्म
घरदार
व्दंव्द समासाचे प्रकार
व्दंव्द समासाचे ३ उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे
(अ) इतरेतर व्दंव्द समास
(ब) वैकल्पिक व्दंव्द समास
(क) समहार व्दंव्द समास
(अ) इतरेतर व्दंव्द समास
ज्या समासांचा विग्रह करताना आणि या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो त्यास 'इतरेतर व्दंव्द समास' असे म्हणतात.
इतरेतर व्दंव्द समासाचे उदाहरण
माता-पिता - माता आणि पिता
हरी-हर - हरी व हर
(ब) वैकल्पिक व्दंव्द समास
ज्या समासाचा विग्रह करताना किंवा, अथवा, अगर या विकल्प दाखविणाऱ्या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो त्यास 'वैकल्पिक व्दंव्द समास' असे म्हणतात.
वैकल्पिक व्दंव्द समासाची उदाहरण
धर्मा-धर्म - धर्म किंवा अधर्म
न्याया-न्याय - न्याय किंवा अन्याय
तीन-चार - तीन किंवा चार
(क) समहार व्दंव्द समास
ज्या समासातील विग्रह करताना त्यातील दोन पदाच्या अर्थाशिवाय त्या जातीच्या इतर पदार्थाचाही समावेश असतो व त्याचा विग्रह करताना वगैरे, इत्यादी, आदी या शब्दांचा उपयोग होतो त्यास 'समाहार व्दंव्द समास' असे म्हणतात.
समाहार व्दंव्द समासाचे उदाहरण
अंथरूनपांघरून - अंथरून पांघरूनासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे
शेतीवाडी - शेती वाडी व इतर संपत्ती
पाप-पुण्य - पाप किंवा पुण्य
भाजीपाला - भाजी आणि इतर पदार्थ(वस्तू)
बहुव्रीही समास व त्याचे प्रकार
ज्या बहुव्रीही समासाचा विग्रह करताना संबंधी सर्वनामाची रूपे ही विभक्तीत असते त्यास 'विभक्ती बहुव्रीही समास' असे म्हणतात.
विभक्ती बहुव्रीही समासाची उदाहरण
प्राप्तधन - प्राप्त आहे धन ज्यास तो
त्रिकोण - तीन आहेत कोण ज्याला तो
निर्धन - गेले आहे धन ज्याच्यापासून तो
ज्या बहुव्रीही समासातील पहिले पद हे उपसर्ग असेल तर तो 'प्राधी बहुव्रीही समास' होतो.
निर्मला
सुलोचना
निर्धन
निर्दय
कुरूप
निरस
दुर्गुणी
विरागी
1 Comments
Very good about study
ReplyDelete