Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

वचन व त्याचे प्रकार मराठी व्याकरण (Proposition And It's Types Marathi Grammar )

वचन

    नामाने दर्शविलेली वस्तू एक आहे की त्या वस्तू एकाहून अधिक आहे असे कळते नामाच्या ठिकाणी संख्या सुचविणे हा एक धर्म आहे त्यास 'वचन' असे म्हणतात .   

vachan v tyache prakar
वचन व त्याचे प्रकार


वचनाचे सर्वसामान्यपणे वाचनाचे दोन प्रकार पडतात 

(१) एकवचन

(२) अनेकवचन



(१) एकवचन

    ज्या नामाच्या रूपावरून एकाच वस्तुचा बोध होतो त्यास एकवचन असे म्हणतात.

                उदाहरणार्थ  :  मुलगा, गाय, पाटी, ईमारत, पुस्तक इ.

नामाचे मुळरूप हेच त्याचे एकवचन असते.


(२) अनेकवचन

    नामाच्या रूपावरून जेव्हा एका पेक्षा अधिक संख्येचा बोध होतो तेव्हा त्यास 'अनेकवचन' असे म्हणतात

                उदाहरणार्थ  :  मुली, गाई, पाट्या, ईमारती, पुस्तके इ.

नामाची अनेकरुपाची नामे बनवितांना काही नामाना प्रत्यय लागतात व काहींची रूपे एकवचना सारखीच असतात.


वचन विचार करताना त्याचे काही नियम पुढीलप्रमाणे


(१) आकारान्त पुल्लिंगी नामाचे एकवचन एकारान्त होते

                उदाहरणार्थ  :  वडा - वडे, कुत्रा - कुत्रे, मासा - मासे.


(२) आकारान्त  खेरीज इतर पुल्लिंगी नामाची रूपे दोन्ही वाचनात सारखीच राहतात 

                उदाहरणार्थ  : बैल - बैल, कवी - कवी, लाडू - लाडू, गहू - गहू


(३) आकारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन आकारान्त किंवा ईकारान्त होते.

                उदाहरणार्थ  : वीट - विटा, भिंत - भिंती, सुन - सुना


(४) ईकारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन याकारान्त होते.

                उदाहरणार्थ  : बी - बिया, बाई - बाया, भाकरी - भाकऱ्या


(५) उकारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वाकारान्त होते.

                उदाहरणार्थ  : सासु - सासवा, जळू - जळवा, जाऊ - जावा.


(६) अकारान्त नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारान्त होते.

                उदाहरणार्थ  : घर - घरे, शेत- शेते, फुल - फुले.


(७) उकारान्त नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारान्त होते.

                उदाहरणार्थ  : वासरू - वासरे, लिंबू  - लिंबे, पाखरू - पाखरे.


(८) एकारान्त नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन इकारान्त होते.

                उदाहरणार्थ  : खेडे - खेडी, गाणे - गाणी.



Post a Comment

0 Comments