Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

नाम व त्याचे प्रकार (Noun And Its Types Marathi Grammar)

नाम

    प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांचा गुणधर्माला दिलेली जि नावे असतात त्यांना ‘नाम’ असे म्हणतात.

                 उदारणार्थ : भांडे, पाणी, मुंगी, हवा, मन, गंगा, काशी, पांढरेपणा, गोडी, शुद्धता.

naam v tyache prakar, नाम व त्याचे प्रकार, noun in Marathi
नाम-व-त्याचे-प्रकार



  नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत.

((१) सामान्यनाम

((२)  विशेषनाम

((३) भाववाचकनाम


    (१) सामान्यनाम 

    एका जातीच्या पदार्थाच्या गुणधर्मामुळे त्या वस्तुला जे सर्वसामान्य नाव दिले जाते     त्याला ‘सामान्यनाम’ असे म्हणतात.

        

            उदारणार्थ : मुलगी, शाळा, तलाव, वाडा.


  सामान्यनामात पुढे अजून दोन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे

(अ)     समूहवाचक नाम

  (ब) पदार्थवाचक नाम


(अ)  समूहवाचक नाम 

एखादया व्यक्तीच्या, प्राण्यांच्या किंवा वस्तूच्या समूहाला जी नावे दिली जातात 

त्या नावांना ‘समूहवाचक नाम’ असे म्हणतात.


         उदारणार्थ : कळप, वर्ग, सैन्य, समिती, आंबराई, थवा, जमाव.


  (ब) पदार्थवाचक नाम  

     काही पदार्थ हे संख्येशिवाय इतर परिणामांनी मोजले जातात त्यांना ‘पदार्थवाचक 

     नाम’ असे मानतात.

              उदारणार्थ : सोने, तांबे, दुध, साखर, पापड, तेल, मीठ.


  (२)  विशेषनाम  

      ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा  प्राण्याचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात.

          उदारणार्थ : राम, आशा, हिमालय, गंगा, भारत, धुळे, मुंबई, दिल्ली, सचिन,

                    अमेरिका, गोदावरी.


(३) भाववाचक नाम 

  ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव     यांचा बोध होतो. त्याला भाववाचक नाम असे म्हणतात.

 

            उदारणार्थ : धैर्य, किर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद.

   

संबंधित प्रश्न उत्तरे

1) नाम म्हणजे काय ?

प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांचा गुणधर्माला दिलेली जि नावे असतात त्यांना ‘नाम’ असे म्हणतात.

2)   नामाचे एकूण किती प्रकार पडतात ?

नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत. (१) सामान्यनाम (२)  विशेषनाम (३) भाववाचकनाम

3)सामान्य नाम  व्याख्या? सामन्य नामाचे प्रकार किती व कोणते ?

एका जातीच्या पदार्थाच्या गुणधर्मामुळे त्या वस्तुला जे सर्वसामान्य नाव दिले जाते  त्याला ‘सामान्यनाम’ असे म्हणतात.

सामान्यनामाचे  दोन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे

  (अ) समूहवाचक नाम (ब) पदार्थवाचक नाम"


 


Post a Comment

0 Comments