Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

लिंगभेद मराठी व्याकरण


लिंग 

 नामाच्या रूपावरून नामाने दर्शित पदार्थाविषयी पुरुषत्व, स्त्रीत्व किंवा नपुसंकत्व याचा बोध होतो तेव्हा त्याला नामाचे 'लिंग' असे म्हणतात.


lingbhed, lingbhed marathi vyakaran, लिंग, ling, लिंगभेद मराठी व्याकरण,lingbhed v tyache prakar

लिंगभेद व त्याचे प्रकार


    लिंगभेदावरून नामाचे एकूण ३ लिंगे आहेत.

(१) पुल्लिंगी 
(२) स्त्रीलिंगी
(३) नपुंसकलिंगी



(१) पुल्लिंगी 

        प्राणीवाचक व वस्तुवाचक  नामातील पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला 'पुल्लिंगी' असे म्हणतात.
            
                उदाहरणार्थ  :  मुलगा, घोडा, बैल, चंद्र, सूर्य, दिवा, कालवा, चिमणा, मुंगळा, पर्वत इ.

तो हा शब्द पुरुषांसाठी वापरत असल्याने शब्दाचा तो ने उल्लेख होत असल्यास पुल्लिंगी होतो.

                    उदाहरणार्थ  :  तो मुलगा, तो घोडा, तो बैल, तो चंद्र, तो दिवा, तो कालवा, 




 (२) स्त्रीलिंगी


    प्राणीवाचक व वस्तुवाचक नामातील स्त्री किंवा मादीजातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना 'स्त्रीलिंगी' असे म्हणतात

                उदाहरणार्थ  :  मुलगी, मेंढी, पाटी, इमारत, भाकरी, चुलती, शिक्षिका, घोडी, चिमणी, मुंगी इ.

ज्या शब्दाचा उल्लेख ती लावून करण्यात येतो तो शब्द स्त्रीलिंगी होतो. ती हा शब्द स्त्री जातीसाठी वापरला 
जातो

                उदाहरणार्थ  :  ती मुलगी, ती मेंढी, ती पाटी, ती इमारत, ती भाकरी, ती घोडी, ती चिमणी इ.



(३) नपुंसकलिंगी


    ज्या नामाच्या रूपावरून पुरुष किंवा स्त्री यांपैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही त्यांना 'नपुंसकलिंगी' असे म्हणतात.

                उदाहरणार्थ  :  पुस्तक, घर, मेंढरू, दगड, शहर, दौत इ.

सर्वसामान्य पणे नपुंसकलिंगी चा उल्लेख ते या शब्दाने करतात. 

                उदाहरणार्थ  :  ते पुस्तक, ते घर, ते मेंढरू, ते शहर इ.



Post a Comment

0 Comments