Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

वाक्यपृथक्करण मराठी व्याकरण | Vakyapruthakaran In Marathi Grammar

 वाक्य पृथक्करण म्हणजे काय?

पृथ्थक म्हणजे वेगळे किंवा सुटे (मोकळे), म्हणजेच वाक्यपृथक्करण म्हणजे वाक्यातील भाग वेगळा करून दाखविणे. कोणतेही वाक्य असू दया त्या मध्ये २ गोष्टी असतातच ते म्हणजे उद्देश आणि विधेय ते उद्देश आणि विधेय वेगळे करणे म्हणजे 'वाक्यपृथक्करण' होय.

Vakyapruthakaran, वाक्यपृथक्करण मराठी व्याकरण,  Vakyapruthakaran In Marathi Grammar
वाक्य पृथक्करण


उद्देश :-

प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल काहीतरी बोलतो म्हणजे विधान करतो ज्याच्या विषयी वक्ता बोलतो त्यास आपण 'उद्देश' म्हणतात


विधेय :- 

उद्देशाविषयी वक्ता जे काही बोलतो त्याला आपण 'विधेय' असे म्हणतो


प्रत्येक वाक्यात उद्देश व विधेय असे २ विभाग असतातच

उदा    त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला.

वरील वाक्यात खेळला हे विधान केले हे विधान मुलगा याबद्दल उद्देशून केले म्हणजे या वाक्यात  मुलगा हे उद्देश आणि खेळला हे विधेय झाले.

तसेच या वाक्यात मुलगा खेळला हे दोनच शब्द नाही तर "त्याचा धाकटा" या दोन शब्दांनी उद्देशाचा विस्तार केलेला आहे म्हणून त्याचा धाकटा हे उद्देश विस्तार आहे व आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला या शब्दांनी (केव्हा, कुठे, व कसा खेळला) हे सांगितले आहे म्हणून हे चार शब्द विधेय विस्तार आहे.


वाक्य पृथक्करणाचे काही नियम

वाक्यपृथक्करण करताना त्या वाक्यातील मुख्य शब्द म्हणजे क्रियापद शोधून काढावे त्यानंतर ती क्रिया करणारा कर्ता कोण आहे ते शोधावे हा कर्ता वाक्यातील उद्देश असतो या उद्देशाबद्दल विशेष काही माहिती सांगणारे शब्द असतील तर ते उद्देश विस्तार होय.

(१) वाक्य पृथक्करण करताना कर्म विधेय विभागात ठेवतात

(२) अकर्मक क्रियापदाचा अर्थ पूर्ण करणारे शब्द विधान पूरक विभागात ठेवतात

(३) क्रियापदाचा कर्ता उद्देश विभागात ठेवतात

(४) कर्त्या बद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द उद्देश विस्तार विभागात ठेवतात.


वाक्य पृथक्करणाचे उदाहरण

(१) अलीकडे मे तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही.

(२) एकदा बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला.

(३) पांढरे स्वच्छ दात मुखात शोभा देतात.

(४) शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोह दिसतो.

(५) एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन धडकली.

(६) विजय नगर च्या साम्राज्याचा जेथे अंत झाला.


उद्देश विभाग

उद्देश विस्तार (विशेषण)

उद्देश

कर्म व कर्म विस्तार

विधानपूरक

विधेय विभाग विधेय विस्तार (क्रियाविशेषण)

विधेय

(क्रियापद)

-

मी

तुम्हाला एकही पत्र

-

अलीकडे

लिहिले नाही

आमचा कुत्रा

काळूराम

-

-

एकदा बागेत खेळताना हौदात

पडला

पांढरे स्वच्छ

दात

मुखात शोभा

-

-

देतात

-

गुलमोहर

-

मोह

शरदाच्या चांदण्यात

दिसतो

युद्ध बंद झाल्याची

बातमी

-

-

येऊन, एके दिवशी

धडकली

विजय नगरच्या साम्राज्याचा

अंत

-

-

जेथे

झाला



वाक्यपृथक्करणाचे आणखी काही वाक्ये स्पष्टीकरणासोबत

(१) माझा प्रिय मित्र प्रकाश माझे पत्र मिळताच लगेच आला.
(२) नदी काठचा गाव सुंदर पहाटेच्या संधी प्रकाशात दिसतो.
(३) हिरवळ श्रावणात सगळीकडे पसरलेली असते.
(४) जगालाच राजा सिंह जंगलात भटकतांना जाळ्यात एकदा सापडला.
(५) बॉम्बस्पोट झाल्याची बातमी येऊन एके दिवशी धडकली.
(६) जुन्या काळच्या गावचे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले.
(७) गालावरचा छोटासा तीळ चेहऱ्यास शोभा देतो.
(८) तुम्ही मला एकही फोन अलीकडे केला नाही.
(९) माझा धाकटा भाऊ संजय सर्वांना उपयोगी पडतो.
(१०) माझे मन त्या सुंदर फुलांनी प्रसन्न झाले.

 

उद्देश विभाग

उद्देश विस्तार (विशेषण)

उद्देश

कर्म व कर्म विस्तार

विधानपूरक

विधेय विभाग विधेय विस्तार (क्रियाविशेषण)

विधेय

(क्रियापद)

माझा प्रिय मित्र

प्रकाश

माझे पत्र

-

मिळताच लगेच

आला

नदी काठचा

गाव

पहाटेच्या संधीप्रकाशात

सुंदर

-

दिसतो

-

हिरवळ

-

-

श्रावणात सगळीकडे

पसरलेली असते

जंगलाचा राजा

सिंह

-

-

जंगलात भटकताना एकदा जाळ्यात

सापडला

बॉम्बस्पोट  झाल्याची

बातमी

-

-

येऊन, एके दिवशी

धडकली

जुन्या काळच्या गावचे

चित्र

-

-

माझ्या डोळ्यासमोर

उभे राहिले

 

गालावरचा छोटासा

तीळ

चेहऱ्यास शोभा

-

-

देतो

-

तुम्ही

मला एकही फोन

-

अलीकडे

केला नाही

माझा धाकटा भाऊ

संजय

सर्वांना

-

-

उपयोगी पडतो

माझे

मन

त्या सुंदर फुलांनी

-

प्रसन्न

झाले





नक्की वाचा !!

Post a Comment

0 Comments